
मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरम चा 3 रा वर्धापन दिन
नमस्कार मराठी व्यवसायिक मित्रांनो,
मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरम चा 3 रा वर्धापन दिन आपण येत्या 10 ऑगस्ट रोजी साजरा करीत आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील चुकू नये असा कार्यक्रम होणार आहे.
आम्ही दरवर्षी जे वर्धापन दिनाला करतो आपणास पुरवतो ते नावीन्यपूर्ण व स्फूर्तिदायक असते यावर्षी ही आम्ही ते पुरवणार आहोतच
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील आम्ही तुम्हाला वेगळे काहीतरी देणार आहोत. यावर्षी आपण दोन पुरुष उद्योजक व 2 महिला उद्योजिका त्यांना पुरस्कृत करणार आहोत. हे पुरस्कार अशाच व्यक्तीला दिले जातात ज्यांनी शून्यातून विश्व उभे केले आहे. येणाऱ्या आर्थिक सामाजिक व कौटुंबिक अडचणींवर मात करून स्वतःच्या व्यवसायामध्ये शिखरा सारखे यश प्राप्त केलेले आहे.
याचबरोबर आम्ही आपल्याला एक पर्वणी देणार आहोत यावेळी आपल्या ह्या कार्यक्रमाला दोन दिग्गज प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत.
मग कोण आहेत हे बलाढ्य व्यवसायिक ??
अध्यक्षस्थानी लाभले आहेत श्री भरत भुजबळ. एम डी युनिटेक ऑटोमेशन प्रा लि. 1997 साली बाराशे रुपयांची अल्फा लवाल सारख्या कंपनी ची नोकरी सोडून व्यवसायात पदार्पण केले. ‘व्यवसाय कसला तर इलेक्ट्रिशियनचा’ आज त्यांची कंपनी कमिन्स आणि सीमेन्स सारख्या कंपनीची मुख्य सप्लायर आहे. युनिटेक ऑटोमेशन प्रा लि. ही कंपनी सध्या घरगुती वायर ते हाय टेन्शन केबल चे मॅन्युफॅक्चरिंग करतात.
इलेक्ट्रिशन ते वायर व केबल मॅनुफॅक्चरर चा प्रवास सदर कार्यक्रमात उलगडणार आहेत.
आपले दुसरे व्यवसायिक व आपले प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत “हॉटेल पूर्णब्रह्म” चे संचालक श्री मनीष जी शिरसाओ व सौ जयंती ताई कठाळे एम डी ” मनस्विनी फूड्स प्रा. ली. ” यांची ओळख म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानात वडापाव विकून दाखवणाऱ्या पहिल्या मराठी व्यावसायिका. नऊवारी साडी नेसून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मराठी पारंपरिक जेवणाची अस्सल चव त्यांनी आपल्या पूर्णब्रह्म हॉटेल च्या माध्यमातून संपूर्ण जगात पोहोचवलेली आहे.
आयटी प्रोफेशनल ते हॉटेल व्यवसाय हा प्रवास कसा घडला हे जाणून घ्या याच कार्यक्रमात
प्रवेश फी : 0/- परंतु नोंदणी आवश्यक
तरी आपणास सदर कार्यक्रमास यायचे असेल तर खालील लिंक वर आपले रजिस्ट्रेशन करा
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdlj0FRLEcGi95NvvL5Y8sekSUOaZIdlHhyDfg3OAz22HpFyw/viewform?usp=pp_url
कार्यक्रमाची माहिती खालील प्रमाणे :
📅 दिनांक : 10 ऑगस्ट 2018 (शुक्रवार)
🕰 वेळ : सायं 17 30 वाजता
📩 स्थळ : जवाहलाल नेहरू हॉल घोले रोड शिवाजीनगर पुणे.
☎ अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री उमाकांत देशमुखे 📱 9420411934
श्री शिरीष देशपांडे 📱 9767587758
श्री नंदकुमार तळेकर 📱 9922444428
चला अशाच यशस्वी उद्योजकां चे मार्गदर्शन घेत आपला व्यवसाय वाढवू या